भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘लहानपणापासून कीर्तने ऐकल्याने मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होणे अन् वयाच्या १२ व्या वर्षापासून स्वतः कीर्तन करण्यास आरंभ करणे आणि श्री गजानन महाराज यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती’, हा भाग वाचला. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/827614.html

पू. प्रा. सु.ग. शेवडे

३. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्री. राम होनप

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझी अनेक वेळा भेट झाली आहे. ते मला हिंदु धर्मातील विविध सूत्रांविषयी प्रश्न विचारायचे. त्यांनी मला विचारले, ‘‘सनातन धर्मात चातुर्वर्ण सांगितला आहे. त्याचा अर्थ काय ? त्याची आताही आवश्यकता आहे का ?’’ मी त्यांना या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा बाळासाहेबांना ही उत्तरे आवडली. ते मला म्हणाले, ‘‘मला हिंदु धर्म तुमच्यामुळे समजला !’’

४. वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी करतांना काँग्रसने भारत देशाच्या पाठीत खंजीर खुपसणे

‘स्वातंत्र्याच्या काळात बॅ. जिना यांनी म. गांधींना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘हिंदुस्थानात हिंदु आणि मुसलमान हे मोठ्या संख्येने रहाणारे दोन समुदाय आहेत. त्यांचे धर्म, संस्कृती, आचार-विचार, तसेच आदरणीय आणि तिरस्करणीय व्यक्ती भिन्न आहेत. त्यामुळे हे दोन्ही समुदाय परस्परांपासून भिन्न आहेत. या दोघांनी एकत्र रहाणे हितावह नाही. त्यामुळे ‘या दोन समुदायांचे विभाजन करून मुसलमानांना या देशातील भूमीचा काही भाग स्वतंत्रपणे द्यावा’, हेच योग्य आहे.’ म. गांधींचे व्यक्तीमत्त्व दुहेरी होते. त्यांनी बॅ. जिना यांना उत्तर दिले, ‘‘कुणी काही म्हटले, तरी हिंदु आणि मुसलमान एकत्र असावेत. भारत देशाचे तुकडे होऊ नयेत’, असे मला वाटते.’’

माझ्या मते बॅ. जिना यांनी मांडलेली सूत्रे योग्यच होती. ‘देशाचे तुकडे करावेत कि नाही ?’, हा भाग वेगळा आहे. पुढे बॅ. जिना यांनी सांगितल्यानुसार भारताची फाळणी करण्यात आली. भारत देशाचा एक तुकडा मुसलमानांना देण्यात आला. मग ‘दुसरा तुकडा, म्हणजे भारत ‘हिंदु राष्ट्र’ आहे’, हा साधा तर्क आहे.

काँग्रसने या देशाच्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेसने मुसलमानांना देशाचा एक तुकडा दिला आणि भारत हा सर्वधर्मसमभाव जपणारा आहे; म्हणून काही मुसलमान भारतातच ठेवले. भारतात मुसलमानांची संख्या पुष्कळ वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष मतांसाठी मुसलमानांची बाजू घेत आहेत. त्यांत काँग्रेस आघाडीवर आहे. ‘पंडित नेहरू मुळात मुसलमान होते’, हे सत्य हिंदूंपासून लपवण्यात आले. ही हिंदूंच्या डोळ्यांत केलेली धूळफेक होती. ही स्थिती पालटण्यासाठी अतिशय कडवट हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी.’ (समाप्त)

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक