Jagadguru Paramhans Maharaj : सरकारने औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही, तर आम्ही बाबरी ढाचा पाडला, तशी ही कबरही उद्ध्वस्त करू ! – जगद्गुरु परमहंस महाराज, अयोध्या छावणीचे मुख्य पुजारी

अयोध्या छावणीचे मुख्य पुजारी जगद्गुरु परमहंस महाराज यांची महाराष्ट्र सरकारला चेतावणी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्या छावणीचे मुख्य पुजारी जगद्गुरु परमहंस महाराज यांनी महाराष्ट्र सरकारला चेतावणी देतांना म्हटले आहे की, सरकारने औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अन्यथा ज्याप्रमाणे बाबरी ढाचा पाडण्यात आला, त्याचप्रमाणे औरंगजेबाची कबरही उद्ध्वस्त केली जाईल.

परमहंस महाराज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, महाराष्ट्रासाठी सर्वांत मोठा कलंक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सरकारने कबर काढून टाकण्याचे आश्‍वासन दिले, तर काही हरकत नाही. अन्यथा आम्ही कबर हटवण्यासाठी मोर्चा काढू. प्रयागराजमध्ये कोट्यवधी संत आले आहेत. कुंभ संपताच संत समुदाय महाराष्ट्राकडे प्रयाण करेल. यासाठी आम्ही सर्व हिंदु संघटनांशी बोलण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम्ही लोकांना आवाहन केले होते की, भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन करावे. महाराष्ट्रात सनातन प्रेमींनी भाजपचे सरकार स्थापन केले. त्यामुळे येथून औरंगजेबाची कबर हटवणे आवश्यक आहे.