रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

रत्नागिरी, २० जानेवारी – देवस्थाने ही हिंदु धर्माची आधारशीला असून देवस्थानांमुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती टिकून आहे. स्थानिक महसूल प्रशासनाच्या साहाय्याने या शेतभूमीवरील देवस्थानांचे नाव अवैधरित्या काढून बर्याचशा भूमी हडपण्यात आलेल्या आहेत. हे थांबावे, यासाठी कायदेशीर फौजदारी स्वरूपाची शिक्षा होण्याकरता सक्षम कायदा नाही. त्यामुळे देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कायदा करावा आणि त्याची कार्यवाही करावी, तसेच राज्यात देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात विशेष पथकाची नेमणूक करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आले. श्री लक्ष्मी केशव देवस्थान ट्रस्ट, कोळीसरे आणि श्री देव नीळकंठेश्वर देवस्थान, कोंडगाव, तालुका संगमेश्वर या देवस्थानांच्या वतीनेही हे निवेदन देण्यात आले.
अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना देवस्थानांच्या पदाधिकार्यांची उपस्थिती
अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना रत्नागिरी शहरातील श्री मारुति मंदिराचे सर्वश्री मृत्युंजय खातू, श्रीराम जाधव, सतीश मुळ्ये; श्री हनुमान मंदिर, किल्लाचे श्री. आशिष मोरे; श्री सांब मंदिर, किल्लाचे भक्त श्री. रमेश सुर्वे; श्री नवलाई पावणाई जाकादेवी मंदिर, पिंपळवाडी, नाचणेचे श्री. लंबोदर करमरकर; श्री राधाकृष्ण मंदिर, वैश्य संस्था आणि श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्लाचे श्री. अजय गांधी; श्री देव गंगेश्वर मंदिर, कोळंबेचे श्री. प्रकाश दामले; श्री देव आदित्यनाथ मंदिर, नेवरेचे श्री. मनोहर मोरे; श्री लक्ष्मी केशव देवस्थान, कोळीसरेचे सर्वश्री मनोहर विचारे आणि उमेश तेरेदेसाई; श्री देव नीळकंठेश्वर देवस्थान, कोंडगाव, ता. संगमेश्वरचे श्री. जयंत आठल्ये; हिंदु जनजागृती समितीचे श्री. अण्णासाहेब दिवटे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी आदी उपस्थित होते.