‘डिसेंबर २०२३ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आले होते. १७.१२.२०२३ या दिवशी सद्गुरु गाडगीळकाका आश्रमाजवळील सनातन संकुलात असलेले सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांचे निवासस्थान पहाण्यासाठी आले होते. तेव्हा ‘सद्गुरु काका तिथे आले आहेत’, याची मला काहीच कल्पना नव्हती.
प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या शेजारच्या खोलीत मी रहात होते. १७.१२.२०२३ या दिवशी मी माझ्या खोलीत जात होते. तेव्हा प.पू. फडकेआजींच्या खोलीच्या बाहेर असलेली पादत्राणे (चपला) पाहून माझ्या मनात ‘तिथे सद्गुरु गाडगीळकाका आले असावेत’, असा विचार आला. नंतर याविषयी मी एका साधिकेला विचारल्यावर ‘प.पू. फडकेआजींच्या खोलीत सद्गुरु काका आले होते’, असे मला समजले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला संतांची स्पंदने आणि चैतन्य अनुभवण्यास शिकवल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. विद्या गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०२४)
|