ईश्वरकृपेने हिंदु जनजागृती समितीला लाभला एक धर्मतेजाचा वैचारिक योद्धा ।

१९ ऑगस्ट २०२४ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने समितीचे श्री. अरविंद पानसरे यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

श्री. रमेश शिंदे
श्री. अरविंद पानसरे

शब्दांना ज्यांच्या असे सत्याची धार।
धर्मद्रोह्यांवर बरसती आसूड फार।। १।।

धर्मतेजाची तळपती तलवार।
जशी शिवछत्रपतींची भवानी तलवार।। २।।

नाही भीडभाड, शब्दांचा मारा आरपार।
भयभीत होऊन धर्मद्रोही होती बेजार।। ३।।

‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ या षड्यंत्रावर करती प्रहार।
धर्मद्रोह्यांची षड्यंत्रे होती विफल फार।। ४।।

दूरचित्रवाहिन्यांवर धर्मद्रोह्यांचे पाखंड खंडण करती।
हिंदुत्वाला नेहमी वैचारिक आधार देती।। ५।।

धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ विचारांची खाण।
आहेत आमचे रमेशदादा।। ६।।

‘सांस्कृतिक योद्धा’ असे त्यांच्या शिरपेचात तुरा।
संस्कृती रक्षणाची घेतली त्यांनी धुरा।। ७।।

धर्मनिष्ठ विचारांनी होतो जागर हिंदु राष्ट्राचा।
होत आहे हृदयी जयजयकार ईश्वरी कार्याचा।। ८।।

साधनेत असे त्यांच्या तत्त्वनिष्ठा आणि समर्पण।
ईश्वरी कार्यासाठी केले आहे त्यांनी तन, मन, धन अर्पण।। ९।।

ईश्वरी सेवेसाठी रात्रंदिनी देह झिझवती चंदनापरी।
धर्मतेजाची ज्योत सदा तेवत असे अंतरी।। १०।।

असे हिंदु राष्ट्राचे शिलेदार।
ज्यांच्या विचार-वक्तृत्व यांना आहे तेजाची धार।। ११।।

धर्मद्रोह्यांवर करती ते सडेतोड प्रहार।
कारण गुरुचरणांचा आहे हृदयी नित्य आधार।। १२।।

– श्री. अरविंद पानसरे, हिंदु जनजागृती समिती, गोवा. (१८.८.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक