‘रुग्णचिकित्सा करणार्‍या वैद्याने स्वतः साधना करणे आणि रुग्णांना साधना सांगण्याचा प्रयत्न करणे’, किती आवश्यक आहे !’ याची प्रचीती घेतलेल्या मथुरा येथील वैद्या (सौ.) पूनम शर्मा !

वैद्या (सौ.) पूनम शर्मा

१. आधीची ५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत नसतांना सहा मासांपासून पुन्हा रुग्णचिकित्सा करायला आरंभ केल्यावर ती सहजतेने करता येणे :

‘मी वैद्य आहे. वर्ष २०२२ पासून मी वैद्यकीय व्यवसाय, म्हणजे रुग्णचिकित्सा करायला पुन्हा आरंभ केला आहे. त्याआधी ५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत नव्हते. रुग्णचिकित्सा करतांना माझ्या लक्षात आले, ‘मी मागील ५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत नसले, तरीही आता मी सहजतेने रुग्णचिकित्सा करू शकत आहे.’

२. मी ज्या रुग्णांना केवळ औषधे दिली होती; मात्र साधना सांगितली नव्हती, त्या रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांमध्ये म्हणावी तेवढ्या प्रमाणात सुधारणा झाली नव्हती.  

३. रुग्णांना औषधे देण्यासह त्यांना साधना सांगितल्यावर त्यांना झालेले लाभ

३ आ १. रुग्णांना नामजपादी उपाय करायला सांगणे : आता गुरुकृपेने माझ्याकडून ‘रुग्णांच्या शारीरिक आजारामागे काही आध्यात्मिक कारण असू शकते का ?’, हे शोधण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ ३ मासांत मला ५०० रुग्णांची चिकित्सा करण्याची संधी मिळाली. मी रुग्णांना औषधे दिली आणि त्यांना साधना म्हणून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे, कुलदेवतेचा नामजप करणे, मीठ-पाण्याचे उपाय करणे, दृष्ट काढणे, औषध घेण्यापूर्वी कुलदेवता आणि धन्वंतरि देवता यांना प्रार्थना करणे इत्यादी उपाय सांगितले.

३ आ २. रुग्णांनी त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ‘त्यांना शारीरिक स्तरावर चांगला लाभ झाला आणि त्यांच्या मनाची सकारात्मकताही वाढली’, असे मला आढळून आले.

३ आ ३. अनेक रुग्णांनी नामजप करायला आरंभ केला आहे.

४. पाच वर्षांपूर्वी रुग्णचिकित्सा करत असतांना रुग्ण ठीक होण्याचे प्रमाण न्यून असणे; मात्र आता रुग्णचिकित्सा करतांना रुग्ण ठीक होण्याचे प्रमाण अधिक असणे

माझ्यासाठी ५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा खासगी वैद्यकीय व्यवसाय चालू करणे, ही कठीण गोष्ट होती. माझ्या मनात ‘मला रुग्णचिकित्सा करायला जमणारच नाही’, असा नकारात्मक विचार येत होता. मी वर्ष २०२२ पासून पुन्हा रुग्णचिकित्सा करायला आरंभ केल्यापासून मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी रुग्णचिकित्सा केल्यानंतर रुग्ण ठीक होण्याचे प्रमाण ५ वर्षांपूर्वी न्यून असायचे. आता रुग्ण ठीक होण्याचे प्रमाण अधिक आहे.

५. यातून ‘रुग्णचिकित्सा करणार्‍या वैद्याने स्वतः साधना करणे आणि रुग्णांना साधना सांगण्याचा प्रयत्न करणे’, किती आवश्यक आहे !’, हे मला शिकायला मिळाले.’

मला अशी सुंदर अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– वैद्या (सौ.) पूनम शर्मा, मथुरा, उत्तरप्रदेश.(१०.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक