हरिद्वार (उत्तराखंड) – मला माझी ‘रामदेव’ ही ओळख उघड करण्यात कसलीही अडचण वाटत नाही; मग ‘रहमान’ला अडचण का असावी ? प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान वाटला पाहिजे. नाव लपवण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे काम मनापासून करणे महत्त्वाचे आहे. जर स्वतःचे काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करत असू, तर मग हिंदु, मुसलमान किंवा इतर कुठल्याही धर्माचे असो, त्याने काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेव बाबा यांनी कावड यात्रामार्गांतील दुकानांवर मालकांचे नाव लिहिण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशावर व्यक्त केली.