Chandrababu Naidu : हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध !

  • आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आश्‍वासन

  • मुख्यमंत्र्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

  • तिरुपती देवस्थानाच्या प्रशासनातील भ्रष्टाचार नष्ट करण्याचा निर्धार !

आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेताना

तिरुमला (आंध्रप्रदेश) – हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे आश्‍वासन आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले. नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री नायडू पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्‍वर मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या ‘तिरुमला तिरुपती देवस्थान प्राधिकरणा’च्या कारभारात अनियमितता होती. मी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या प्रशासनातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे.

मी शासकीय यंत्रणेच्या शुद्धीकरणाचा प्रारंभ तिरुमलापासून करीन. तिरुमलाला अपवित्र करणे, हे मला अमान्य आहे. तिरुमलामध्ये केवळ गोविंदाच्या नामाचा गजरच राहील. पूर्वीच्या राज्य सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानचे व्यापारीकरण केले. त्यांनी या पवित्र धार्मिक स्थळाला गांजा, दारू आणि मांसाहार यांचे केंद्र बनवले. वर्ष २०४७ पर्यंत तेलुगु लोक जगात पहिल्या क्रमांकावर असतील. मी आंध्रप्रदेशला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवीन. राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. आम्ही चांगल्याचे रक्षण करू आणि वाईटांना शिक्षा करू.’’