Acharya Pramod Krishnam : सनातन धर्म संपवणे, हेच काँग्रेसचे स्वप्न ! – आचार्य प्रमोद कृष्णम्, काँग्रेसचे माजी नेते

काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् व काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – सनातन हिंदु धर्म, संस्कृती आणि भारताचे संस्कार नष्ट करणे, हेच काँग्रेसचे ध्येय आहे. ही ती काँग्रेस नाही, जिची स्थापना देशासाठी झाली होती. सध्याची काँग्रेस भारतीय संस्कृतीपासून लांब निघून गेली आहे. सनातन धर्म संपवणे, हेच त्यांचे स्वप्न आहे. हिंदु नावाची एक शक्ती आहे, तिला आम्ही नष्ट करू, अशा वल्गना राहुल गांधी यांनी केल्या आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आचार्य कृष्णम् यांनी अलीकडेच काँग्रेस सोडली. ते पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कधीच ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देतांना पाहिले नाही. त्यांनी कधीच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराणा प्रताप की जय’, ‘गुरु गोविंद सिंह महाराज की जय’ असे म्हटले नाही. तसेच ‘भगवान श्रीकृष्ण की जय’, ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय’ अशा घोषणाही त्यांच्या तोंडून कधी ऐकायला मिळाल्या नाहीत. त्यांच्या तोंडून कधीच ‘गौमाता की जय’, ‘गंगा माता की जय’ अशा घोषणाही आल्या नाहीत.

संपादकीय भूमिका

पक्षासाठी अनेक दशके सर्वस्व वाहिलेल्या एका आचार्यांचे काँग्रेसविषयीचे हे वक्तव्य आहे. यातून काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे स्वरूप अधिक जोरकसपणे समोर येते !