‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. ९ फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/762977.html

सौ. सुप्रिया माथूर

७. प्रसंग – परिपूर्ण सेवा न करणे

७ अ. दृष्टीकोन

श्रीमती अश्विनी प्रभु

१. ‘सेवेत आपला सहभाग किती आहे, यावरून ‘आपण सेवा कशी करतो’, हे स्पष्ट होते.

२. अल्पसंतुष्टतेमुळे जीव तोडून सेवा करण्यात अडचण येते.

३. ईश्वरचरणी समर्पित होऊन सेवा केल्यास ईश्वराचे साहाय्य मिळते. आपण सर्वकाही सेवेची धोरणे आणि कार्यपद्धती यांनुसार करत असतो; परंतु अधिक उत्तम होण्यासाठी विचारून केल्यामुळे उत्तम प्रक्रिया होते.

४. सतत शिकण्याचा ध्यास हवा.

५. स्वतःचा आढावा अधिक सखोलतेने घ्यावा. अल्पसंतुष्टता येताच तळमळ वाढवण्यासाठी स्वयंसूचना द्यावी.

६. एकच सेवा सतत केल्याने आपल्याला ती सेवा येते, कृतीच्या स्तरावरही योग्य रीतीने होते. त्यामुळे आपल्यात दैवी गुण वाढवण्याचे प्रयत्न करायचे. ‘ती सेवा मला येते, मी करत आहे’, याचा अर्थ परिपूर्णता नव्हे.

७. देहशुद्धीसाठी देवाने ही स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया दिली आहे. त्यासाठी त्याला हवी तशी प्रक्रिया झाली पाहिजे, असा सकारात्मक विचार सतत करणे महत्त्वाचे असून याचे चिंतन झाले पाहिजे.

८. प्रसंग – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेत प्रारंभी असलेला उत्साह न्यून होणे

८ अ. दृष्टीकोन

१. आपण शारीरिक दृष्टीने दुर्बळ असलो, तरी मनात उत्साह असेल, तर प्रयत्न होतात. आरंभी थोडी चिकाटी असते. नंतर ‘थोडे थोडेच करत जाऊया’, असे विचार येणे, म्हणजे ‘सातत्याने एकच कृती करण्याचा कंटाळा येणे’, असे म्हणू शकतो.

२. वास्तवात मनात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी उत्साह असल्यास आध्यात्मिक स्तरावरील नावीन्य प्राप्त होते; परंतु मनोराज्यात विहार करून केवळ विचारच होतात, कृती होत नाही. तेच अंतर्मुखतेने केले, तर आध्यात्मिक स्तरावरचे नावीन्य प्राप्त होते.

३. प्रक्रिया बुद्धीने केल्यास निरुत्साह वाटतो. थोडे थोडे करत जाऊया या विचाराच्या वेगाने गेल्यास वेळ पुष्कळ लागतो. आपल्याला मिळणारी ऊर्जा म्हणजे भगवंताचा अंश असतो; म्हणून प्रक्रिया त्याच गतीने केली पाहिजे.’

– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळूरू. (१३.७.२०१९) (क्रमश:)

भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/763934.html