बेळगाव (कर्नाटक) – अयोध्येत श्रीराममंदिर उभारू नये; म्हणून न्यायालयात खटला प्रविष्ट करणार्या व्यक्तीनेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. सर्व धर्मीय एकोप्याने जीवन जगत आहेत. ‘सर्वांमध्ये एकजूट झाली पाहिजे’, अशी मुसलमानांची इच्छा आहे; परंतु केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये एकजूट होऊ नये, असा काँग्रेस आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा उद्देश आहे, असा आरोप भाजपचे नेते अन् माजी मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे; परंतु पुढील काळात सर्व जण एकजूट होतील, याची निश्चिती मला आहे.