CPI(M) Unwanted Advice : धर्म हा वैयक्तिक विषय असल्याने त्याचा वापर राजकीय लाभासाठी न करण्याचा माकपचा फुकाचा सल्ला !

माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांचा श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्यास नकार !

माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी

नवी देहली – धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचा वापर राजकीय लाभासाठी केला जाऊ नये, असे विधान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते; मात्र त्यांनी या सोहळ्याला उपस्थित रहाण्यास नकार दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर माकपकडून सामाजिक माध्यमातून एक पोस्ट प्रसारित केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजप आणि रा.स्व. संघ यांनी एका धार्मिक कार्यक्रमाचे सरकारी कार्यक्रमात रूपांतर करणे दुर्दैवी आहे, ज्यामध्ये पंतप्रधान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी अधिकारी थेट सहभागी होत आहेत. राज्यघटनेनुसार भारतात राज्यकारभाराला कोणताही धार्मिक संबंध नसावा. सत्ताधारी पक्ष त्याचे उल्लंघन करत आहे.

संपादकीय भूमिका

  • माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा  चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?
  • रशियामधील कम्युनिस्ट ख्रिस्ती धर्माचे, तर चीनमधील कम्युनिस्ट बौद्ध धर्माचे पालन करतात; मात्र भारतातील तथाकथित हिंदु धर्मीय कम्युनिस्ट हिंदु धर्मांवर टीका करून ते साम्यवादी असल्याचे ढोंग करतात !