महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

मुंबई – नुकतीच दिवाळी होऊन गेली. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ (रेशनच्या दुकानावर १०० रुपयांत रवा, चणा डाळ, साखर, खाद्य तेल असे खाद्यपदार्थ दिले जातात.) दिला जातो. यात पामतेलाचाही समावेश असतो. हे पामतेल हलाल प्रमाणित असल्याचा शिक्का त्या तेलाच्या पिशवीवर दिलेला आहे, असे नुकतेच आढळून आले आहे. (इस्लामीकरणाच्या दिशेने पाऊल पडून आर्थिक जिहाद घडवू पहाणारा शिधा ‘आनंदाचा शिधा’ कसा होईल ? हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावे ! – संपादक) 


‘आनंदाचा शिधा’मध्ये आढळलेल्या ‘हलाल प्रमाणित’ शिक्क्याला धर्मप्रेमींचा विरोध !

‘आमच्या घरी आलेल्या ‘आनंदाचा शिधा’च्या अंतर्गत मिळणार्‍या पामतेलाच्या पिशवीवर ‘हलाल प्रमाणित’ असा शिक्का आहे’, याविषयी अमरावती येथील एका धर्मप्रेमी हिंदूने स्वतःहून दैनिक ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली आहे. तसेच ‘ट्विटर’वर अमित बजाज नावाच्या खात्यावरून ११ नोव्हेंबर २०२३ या दिवशी प्रसारित झालेल्या पोस्टमध्ये ‘आनंदाचा शिधा’मध्ये मिळणारे तेल ‘हलाल प्रमाणित’ आहे.

हेच तेल आपण दिव्यासाठी आणि उपवासासाठीही वापरतो. सरकार कोट्यवधी हिंदूंच्या भावना का मोडत आहे ?’ असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

‘हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला उखडून टाकत आहे, हे महाराष्ट्र सरकारला ठाऊक नाही का ?’, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे !