नूंह, हरियाणा येथे पुन्हा गोहत्या ; गोतस्कर हसन महंमद यास अटक

गोतस्कर हसन महंमद

नूंह (हरियाणा ) –  येथे पुन्हा एकदा गोहत्येची घटना घडली आहे. येथील काही लोक रात्रीच्या वेळी शेतात गायी आणून त्यांची हत्या करतात, अशी माहिती नूंह पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री धाड टाकून हसन महंमद नावाच्या आरोपीला अटक केली. घटनास्थळी उपस्थित असलेले इतर काही गोतस्कर अंधाराचा लाभ उठवत पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हसन महंमदकडून २ जिवंत गायी जप्त करण्यात आल्या आहेत, तर एक गाय मान कापलेल्या स्थितीत आढळली. हसन महंमदसह सर्व आरोपींच्या विरोधात गोवंश कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. गेल्या महिन्यात नूंहमध्ये काही गोतस्करांना अटक करण्यात आली होती. गोहत्या रोखणारे मोनू मानेसार आणि बिट्टू बजरंगी यांच्या विरोधात धर्मांधांनी मोहीम चालू केली होती. जलाभिषेक यात्रेच्या वेळी बिट्टू बजरंगी यांच्यावर आक्रमण झाले होते. याच काळात मोनू मानेसार यांच्यावरही आक्रमण करण्याची सिद्धता करण्यात आली होती.