भोपाळमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याचा कट उघड !

भोपाळ (मध्यप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच अटक केलेला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी कासिफ खान याच्या पोलीस अन्वेषणात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. कासिफ खान याचा भोपाळमध्ये बाँबस्फोट घडवायचा त्याचा कट होता, तसेच संपूर्ण मध्यप्रदेशात इस्लामिक स्टेटचे जाळे उभारण्याचे दायित्व त्याच्यावर सोपवण्यात आले होते. कासिफ सामाजिक प्रसारमाध्यमांवर आतंकवादाचा प्रचार करत होता, तसेच तो जंगलात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देत होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कासिफचे लक्ष्य भोपाळचे राणी कमलापती रेल्वे स्थानक होते. तो भोपाळमधील इतर गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा विचार करत होता. कासिफने त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी भोपाळमधील अनेक वर्दळीच्या भागांची टेहाळणी केली होती. या वर्षी मे मासामध्ये एन्.आय.ए.ने महंमद आदिल खान, सय्यद ममूर अली आणि महंमद शाहिद यांना जबलपूर येथून अटक केली होती. हे सर्व जण इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचा आरोप आहे. एन्.आय.ए.ने तिघांचीही चौकशी केल्यानंतर कासिफचा माग काढणे चालू केले होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या जिवावर उठलेल्या जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !