मासाभरात जिल्ह्यातील ५ वी घटना !
मालवण – तालुक्यातील धामापूर, सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपति मंदिरातील दानपेटी फोडून २७ जुलै या दिवशी त्यातील रोख रक्कम चोरण्यात आली. २८ जुलै या दिवशी सकाळी नितीन सातार्डेकर हे नित्य पूजेसाठी मंदिरात गेले असता त्यांना दानपेटी फोडल्याचे निदर्शनास आले. मंदिरात चोरी होण्याची मासाभरातील ही पाचवी घटना आहे. या आधी वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिर आणि तांबळेश्वर येथील श्री भगवती मंदिरात, तसेच सागरेश्वर येथील मंदिर अन् वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ४ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! |