उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान महाकालच्या पालखी यात्रेच्या वेळी घडलेला प्रकार
उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे भगवान महाकालच्या यात्रेच्या वेळी छतावरून यात्रेकरूंवर थुंकणार्या तिघांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. १७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात ही घटना घडली होती. या वेळी यात्रेत सहभागी हिंदूंनी संबंधितांना असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. काही यात्रेकरूंनी याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. हिंदुत्वनिष्ठांनी या तिघांना अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. यांतील दोघे जण अल्पवयीन आहेत. याविषयी माहिती देतांना पोलीस अधीक्षक आकाश भूरिया यांनी सांगितले की, संबंधित तरुण हे ‘विशिष्ट समाजा’तील आहेत.
सुदर्शन की खबर का सार्थक असर
जिस छत से बाबा महाकाल की सवारी पर थूका गया था, उस मकान को बुलडोजर से मिट्टी में मिला दिया गया
ढोल नगाड़ों के साथ भारी पुलिस बल बुलडोजर के साथ पहुंचा और बाबा महाकाल की सवारी पर थूकने वाले मकान को मलबे के ढेर में बदल दिया@ChouhanShivraj @HMOIndia… pic.twitter.com/Npox29kxJJ
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) July 19, 2023