(म्हणे) ‘अमेरिकेने भारतधार्जिणी वक्तव्ये करू नयेत !’  – पाकिस्तान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट !  

नरेंद्र मोदी, जो बायडेन व शहाबाज शरीफ

इस्लामाबाद – अमेरिकेने पाकिस्तानच्या विरोधात भारतधार्जिणी वक्तव्ये करून नयेत, अशा शब्दांत पाकने त्याचा जळफळाट व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याच्या वेळी प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनात ‘पाकिस्तानने त्याच्या भूमीचा आतंकवादी आक्रमणासाठी वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच ‘अल्-कायदा, इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यासह सर्व आतंकवादी संघटनांवर ठोस कारवाई करावी’, असे आवाहन केले होते.

(सौजन्य : Hindustan Times) 

यामुळे पाकचा चांगलाच जळफळाट झाला. या संयुक्त निवेदनाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच पाकिस्तानमधील अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅट मिलर यांना पाचारण केले.

यावर मॅट मिलर यांनीही ‘पाकिस्तानने आतंकवादी गटांच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे’, असे विधान केले.