लागवडीसाठी धान्‍याच्‍या रिकाम्‍या गोण्‍यांचा सदुपयोग करावा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९६

सौ. राघवी कोनेकर

‘भोपळा, दोडके इत्‍यादी वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड करण्‍यासाठी मोठ्या आकाराच्‍या कुंडीची आवश्‍यकता असते. सध्‍या पेठेमध्‍ये मिळणार्‍या कुंड्यांचे मूल्‍य पुष्‍कळ आहे. त्‍यामुळे मोठ्या कुंड्या नसतील, तर गोण्‍या किंवा पोती यांत लागवड करता येते. आपल्‍या घरी गहू, तांदुळ इत्‍यादी धान्‍यांची साठवणूक केल्‍यानंतर त्‍यांच्‍या रिकाम्‍या गोण्‍या शिल्लक रहातात. किराणा सामानाच्‍या दुकानांतूनही अल्‍प मूल्‍य देऊन गोण्‍या विकत घेता येतात. सिमेंटची रिकामी पोतीसुद्धा अल्‍प मूल्‍यात मिळतात.

गोणीत लावलेले रोप

एका गोणीमध्‍ये एक वेल, याप्रमाणे लागवड करावी. लागवड करण्‍यापूर्वी गोणीला खालच्‍या बाजूने पाण्‍याचा निचरा होण्‍यासाठी २ – ३ छिद्रे पाडावीत. गोणीची उंची अधिक असल्‍याने ती १ फूट उंचीची होईपर्यंत वरच्‍या बाजूने दुमडावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (४.३.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
[email protected]