वेलवर्गीय भाज्यांचे फळमाशीपासून रक्षण करण्यासाठी सोपा उपाय !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९४

सौ. राघवी कोनेकर

‘दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडके, कारले इत्यादी वेलवर्गीय भाज्यांना, तसेच अनेक फळझाडांना फळमाशीचा उपद्रव होतो. ही माशी कोवळ्या फळाला डंख मारून त्यात स्वतःची अंडी घालते. त्यामुळे फळ आतून खराब होऊन खाण्यायोग्य रहात नाही. ‘फळमाशीचा उपद्रव होऊ नये’, यासाठी माश्या चिकटणारे सापळे शेतात ठिकठिकाणी लावतात. घरगुती लागवड मर्यादित प्रमाणात असल्याने सापळे विकत आणण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी एक सोपा उपाय करता येतो. परागीभवन यशस्वी झाले की, पुढील २ – ३ दिवसांत फळाचा आकार वाढू लागतो. असे झाले की, ते फळ वेलीवरच सुती कापडाने गुंडाळून झाकून ठेवावे. यासाठी घरातील जुन्या सुती साड्या किंवा ओढण्या यांचे तुकडे वापरता येतात. कापडामुळे फळमाशीला डंख मारता येत नाही आणि दुधी भोपळा, दोडके इत्यादी फळभाज्या सुरक्षित रहातात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२७.२.२०२३)

तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
[email protected]