जाती ईश्‍वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

मुंबई – जाती ईश्‍वराने बनवल्या नाहीत, तर त्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले.


ते पुढे म्हणाले की, माझ्यासाठी सर्व समान आहेत. ‘माझ्यात कोणतीच जात किंवा धर्म नाही’, असे ईश्‍वराने सांगितले आहे; मात्र पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची होती. देशात विवेक आणि चेतना सर्व समान आहे. त्यात कोणताच भेद नाही. केवळ मते वेगवेगळी आहेत.

Mohan Bhagwat Full Speech : मानवता धर्म मानणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म – मोहन भागवत

(सौजन्य : ABP MAJHA)

याचाच लाभ घेत आमच्या देशावर आक्रमणे झाली आणि बाहेरून आलेल्या लोकांनी लाभ घेतला आहे. हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आमच्या उपजीविकेचा अर्थ म्हणजे समाजाप्रतीही दायित्व असणे. प्रत्येक काम समाजासाठी असेल, तर कुणी उच्च आणि नीच किंवा वेगळा कसा असू शकतो ?