|
सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात चालू असलेल्या आक्षेपार्ह घटनांसह पानबाजार, कुडाळ येथे चालू करण्यात आलेल्या ‘दावत ए इस्लामी’ संघटनेच्या शाखेची चौकशी करावी, अनोळखी व्यक्तींचा वाढलेला वावर आणि धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांविषयी माहिती मिळावी, यांसह अन्य मागण्यांसाठी २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी आमरण उपोषण करणार असल्याची चेतावणी पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांनी जिल्हाधिकार्यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे. या सर्व घटनांची तातडीने चौकशी व्हावी, यासाठी हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात राणे यांनी म्हटले आहे की,
१. पानबाजार येथे ‘दावत ए इस्लामी’ या संघटनेचे कार्यालय चालू करण्यात आले होते. कुडाळ शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि कुडाळ पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे रातोरात कार्यालयाचे फलक काढून ते बंदही करण्यात आले; मात्र सदरचे कार्यालय कोणत्या कारणासाठी चालू करण्यात आले होते ? ते कोण चालवत होते ? कुडाळ नगरपंचायतीची अनुमती या कार्यालयाला होती का ? या शाखेचा मुख्य संचालक कोण होता ? या शाखेसाठी काम करणार्या व्यक्तींची नावे काय ? या ठिकाणी रात्री-अपरात्री मोठ्या संख्येने जे अनोळखी चेहरे दिसत होते, ते नेमके कुठच्या वाहनाने आणि कुठून येत होते ? याचा उलगडा होणे कुडाळमधील सजग नागरिकांच्या वतीने मला अपेक्षित आहे. शक्य होईल तेवढ्या लवकर प्रशासकीय यंत्रणेकडून याची चौकशी करून त्याचा उलगडा व्हावा.
२. जिल्ह्यातील किती आणि कोणत्या धर्मस्थळांवर अधिकृतरित्या भोंगे लावले आहेत ? न्यायालयाचा अवमान करून अधिक उंचीवर लावल्या गेलेल्या भोंग्यांची तपासणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून तालुकावार केली जावी. या प्रकरणी माहितीच्या अधिकारात जे सजग नागरिक माहिती मागतील, त्यांना लवकरात लवकर ती उपलब्ध करून दिली जावी.
३. जिल्ह्यात अनोळखी व्यक्तींचे प्रमाण वाढले असून संशयित वस्त्या, गल्ल्या आदी ठिकाणी ओळखपत्रांची तपासणी मोहीम तातडीने राबवली जावी. या मोहिमेत ओळखपत्रांची काटेकोर तपासणी केली जावी. प्रत्येक गाव, रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी दिसणार्या अनोळखी चेहर्यांची नोंद पोलीस प्रशासनाने ठेवावी.
४. पानबाजार, कुडाळ येथे ‘दावत ए इस्लामी’ असा फलक लावला होता. ही संघटना भारतामध्ये आतंकवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नांत असल्याची माहिती ‘News 18 Up Uttarakhand’ या राष्ट्रीय वाहिनीवर ६ मासांपूर्वीच प्रसारित झाली होती. त्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. अशा आतंकवादी विचारांच्या प्रवृत्तीमुळे पोलीस, पत्रकार यांच्यासह सर्व धर्मांतील, जातींतील कुटुंबियांचे जीवन धोकादायक आहे.
हे ही वाचा :
♦ मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !
♦ Pakistani terrorist organisation ‘Dawat-e-Islami’ responsible for killing Kanhaiyalal !
५. ९ जानेवारी २०२३ या दिवशी ‘दैनिक नवराष्ट्र’मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानुसार अज्ञाताने पोलिसांना ‘फोन’ करून ‘वर्ष १९९३ सारखा स्फोट करू’, अशी चेतावणी दिली आहे, तसेच या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने ‘दंगलीसाठी अन्य राज्यांतून काही लोक महाराष्ट्रात आल्याचा दावाही केला आहे. या दाव्यानुसार पानबाजार, कुडाळ येथील परिसरात काही दिवसांपूर्वी जे अनोळखी चेहरे रात्री-अपरात्री फिरत होते, त्यांचा अशा मोहिमेत सहभाग तर नाही ना ? याचेही गांभीर्याने अन्वेषण करावे. जर महाराष्ट्र राज्यात पोलिसांनाच धमकावले जात असेल, तर आम्हा सर्वसामान्य प्रजेचे काय होईल ?
६. मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
७. माझ्याविषयी, माझ्या राष्ट्रहिताच्या कार्याविषयी अपप्रचार करून समाजात कुणी तेढ निर्माण करत असेल, तर त्यांची सखोल चौकशी होऊन माझा अपप्रचार करण्यासाठी कुणी आतंकवादी किंवा आतंकवादी संघटना पैसे पुरवत आहे का ? याचीही सखोल चौकशी करावी.
याविषयी तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, विविध अन्वेषण यंत्रणा, कुडाळ पोलीस ठाणे, कुडाळचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी, प्रसारमाध्यमे आणि आमदार अन् खासदार यांना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
श्री. बाळा राणे यांनी दिलेले निवेदन –
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे ! |