भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे. २ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘कुलाबा दुर्गवर उभारण्यात आलेली अनधिकृत मजारी’विषयीचा लेख वाचला. आज दुर्गाडी दुर्गावरील अतिक्रमणाचा भाग देत आहोत.

(भाग २)

(भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/641437.html)

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहुर्तमेढ ज्या दुर्गावर रोवली, तो ‘दुर्गाडी दुर्ग’ !

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहुर्तमेढ ज्या दुर्गावर रोवली, तसेच ‘भारताचे पहिले आरमार’ जेथे उभारले गेले, त्या ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी दुर्गावर मुसलमानांनी दावा केला आहे. या दुर्गावरील शिवकालीन श्री दुर्गादेवीच्या मंदिराचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असूनही हे मंदिर म्हणजे ‘मशीद’ असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. वर्ष १९७३ मध्ये तत्कालीन आमदार ग.भा. कानिटकर यांनी दुर्गाडी दुर्गावरील ‘श्री दुर्गादेवीचे मंदिर ही मशीद आहे का ?’, असा तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर २२ मार्च १९७३ या दिवशी तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी ‘दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिर आहे. ही वास्तू ‘देऊळ’ म्हणून वापरण्याची हिंदूंची परंपरा आहे’, असे उत्तर दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही गडावरील वास्तू ‘मंदिर’ असल्याचा निर्णय दिला आहे. वर्ष १७४९ मध्ये कल्याणचे सुभेदार वासुदेव जोशी यांनी दुर्गाडी दुर्गावर दुर्गादेवीचा उत्सव केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. पेशव्यांच्या इतिहासात दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीच्या पूजेसाठी वेदमूर्ती महादेव गोडबोले यांची नियुक्ती केल्याचाही उल्लेख आहे. एवढे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट असतांना मुसलमानांनी जिल्हा न्यायालयात ‘श्री दुर्गादेवीचे मंदिर म्हणजे मशीद आहे’, अशी याचिका केली आहे. लोकशाहीत न्यायालयाकडे न्याय मागण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिला आहे; मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, एवढे ऐतिहासिक पुरावे असतांनाही गेली ४८ वर्षे हा प्रश्न न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

दुर्गाडी दुर्गवर जुन्या बांधकामातील असलेली एक भिंत

दुर्गाडी दुर्गाच्या अर्ध्या भागावर हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी !

दुर्गाडी दुर्गावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागे काही अंतरावर जुन्या बांधकामातील एक भिंत आहे. ही भिंत म्हणजे ‘ईदगाह’ (ईदगाह म्हणजे ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा) असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. विशेष म्हणजे या भिंतीवर ‘ईदगाह’ असल्याचे एकही चिन्ह नाही. ‘ईदगाह’च्या दोन्ही बाजूला मिनार असतात, त्याच्या मध्यभागी मौलानाला उभी रहाण्यासाठी जागा असते; पण प्रत्यक्षात तसे काहीही आढळत नाही. असे असतांना या भिंतीला हिरवा आणि पांढरा रंग देऊन ‘बकरी ईद’ आणि ‘रमजान ईद’ या दिवशी या भिंतीपुढे नमाजपठणासाठी सहस्रावधी मुसलमान येतात. या वेळी श्री दुर्गादेवीच्या मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. खरे तर कायदा आणि सुव्यवस्था यांसाठी मुसलमानांचा काडीमात्र संबंध नसलेल्या या गडावर पोलीस अन् प्रशासन यांनी मुसलमानांना प्रवेशबंदी करणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाने ही भिंती असलेल्या दुर्गाच्या अध्र्या भागावर हिंदूंनाच कायमस्वरूपी प्रवेशबंदी केली आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये व्यय करून दुर्गावर २४ घंटे राज्य राखीव दलाचे पोलीस पहार्‍यासाठी ठेवले आहेत. मुसलमान एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर दुर्गाच्या बाजूला असलेल्या मुख्य मार्गावर स्थानिक मुसलनाम नगरसेवकाने ‘ईदगाह मार्ग’ असे रस्त्याचे नामकरणही केले आहे आणि तसा फलकही लावला आहे. अशा प्रकारे पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्धरित्या दुर्गाडी दुर्गाचे इस्लामीकरण चालू आहे.

(भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/641992.html)