दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !
गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !
(टीप : मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी)
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. ‘या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्य सरकारने हटवावे’, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे.
भाग १
‘स्वराज्याची सागरी राजधानी’, अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील रामनाथ (अलिबाग) येथील कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाजवळच सिमेंटचे पक्के बांधकाम करून अनधिकृत मजार बांधण्यात आली आहे. वर्ष २०२१ मध्ये दसर्याच्या दिवशी रायगड येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ आणि ‘मावळा प्रतिष्ठान’ या शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते कुलाबा दुर्गावर तोरण बांधण्यासाठी, तसेच गडावरील तोफांची पूजा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी गडावरील काही दगडांवर चादर पांघरून त्यावर फुले वाहिलेली असल्याचे त्यांना आढळले. शिवप्रेमींनी ते साहित्य हटवले. या प्रकारानंतर काही धर्मांधांनी चादर हटवणार्या शिवप्रेमींना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही कालावधीतच त्याच ठिकाणी सिमेंटचे पक्के बांधकाम करून मजार बांधण्यात आली. १९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी काही स्थानिक मुसलमानांनी कुलाबा दुर्गावर या मजारवर चादर चढवून फुले वाहिली आणि याची छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केली. हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज श्री. रघुजी राजे यांनी ‘ही अनधिकृत मजार हटवावी’, यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे तक्रार केली आहे. ११ जानेवारी २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राजे प्रतिष्ठान या संघटनांकडूनही राज्य पुरातत्व विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे; मात्र अद्यापही कुलाबा दुर्गावरील ही अनधिकृत मजार हटवण्यात आलेली नाही.
(भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/641719.html)