लागवडीतील कामे घरातील सर्वांनी वाटून घ्यावीत !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘आपण आपल्या कुटुंबापुरती भाजीपाल्याची लागवड केल्यावर त्यात नियमितपणे करण्याची अनेक लहानसहान कामे असतात, उदा. झाडांना पाणी देणे, प्रतिदिन देवपूजेची फुले आणि तोडणीसाठी सिद्ध झालेला भाजीपाला काढून आणणे, जीवामृत बनवणे. ही सर्व कामे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी विभागून केली, तर एकावरच अतिरिक्त कामांचा ताण येत नाही. सर्वांनाच लागवड स्वतःची वाटते. पुष्कळ नवीन गोष्टी निसर्गाच्या सान्निध्यात शिकता येतात आणि सर्वांच्या कष्टाचे फळ चाखण्याचा आनंद अनुभवता येतो !’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१६.९.२०२२)