रासायनिक शेतीची भयावहता

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘एका परिचितांकडून समजलेला प्रसंग रासायनिक शेतीची भयावहता स्पष्ट करणारा आहे. एका भाजीविक्रेत्याकडे शेवटची थोडीच भाजी शिल्लक होती. तेथे आलेल्या एका व्यक्तीने भाजीविक्रेत्याला विचारले, ‘‘ही भाजी आता तुमच्यासाठी घरी घेऊन जाणार का?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘आम्ही ही भाजी खात नाही. घराच्या जवळ स्वतःसाठी वेगळी भाजी पिकवतो.’’ आता आपणच अंतर्मुख होऊन ‘आपण नेमके काय खातो ?’, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असाध्य आजार झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच सावध होऊन शुद्ध, सात्त्विक आणि विषमुक्त अन्न मिळवण्यासाठी कृतीशील होऊया !’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.९.२०२२)