लागवड करतांना एकच पीक न घेता समवेत आंतरपिके घ्यावीत !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘नैसर्गिक शेतीमध्ये एका वेळी एकच पीक न घेता मुख्य पिकासह साहाय्यक पिकेही घेतली जातात. या पिकांना ‘आंतरपीक’ म्हणतात. मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असावे. द्विदल धान्याच्या रोपांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये वातावरणातील नत्र मातीत खेचणारे ‘नत्राणू (Nitrogen Fixing Bacteria)’ असतात. यांच्यामुळे सोबत असलेल्या एकदल पिकांना नत्र उपलब्ध होते. एकदल पिकांच्या मुळांवर जे जिवाणू (बॅक्टेरिया) असतात, ते नत्राणूंना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक ती साखर पुरवतात. अशा नैसर्गिक सहजीवनामुळे दोन्ही पिकांचे उत्पन्न वाढते आणि मातीमध्ये ‘यूरिया’सारखी रासायनिक खते देण्याची आवश्यकताच रहात नाही.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.८.२०२२)