उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतल्यानंतर १३ मे या दिवशी राज्यातील बहुतांश मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यात आले.

१. उत्तरप्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने राष्ट्रगीत लावण्याचा निर्णय घेतला होता. याविषयीचे निर्देश सर्व मदरशांना देण्यात आले होते. हे निर्देश राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांसाठी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले  आहे.

२. उत्तरप्रदेश राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी सांगितले की, या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना सर्व जिल्हा कल्याण अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन नियमितपणे होत आहे कि नाही ?, हे जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी पहाणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !