सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या अनमोल सत्संगात साधिकेने अनुभवलेले क्षणमोती !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (२९.३.२०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा ४९ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

दळणवळण बंदीच्या काळात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव देवद आश्रमात बरेच मास निवासासाठी होत्या. ८.१.२०२१ या दिवशी त्या मुंबईला परतल्या. मी (कु. मनीषा शिंदे) त्यांच्या सत्संगात अनुभवलेल्या क्षणमोतींविषयी येथे दिले आहे.

१. साधकांच्या मनातील जाणणाऱ्या सद्गुरु अनुराधा वाडेकर !

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु अनुताईंनी तिची विचारपूस केली. त्यांनी तिला नामजपादी उपाय सांगितले. साधकांच्या मनातील ओळखून त्यांना सर्वकाही देणाऱ्या सद्गुरु अनुताई म्हणजे ‘प्रती परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असे मला वाटते.

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांचे प्रीतीमय हास्य !

पू. (सौ.) संगीता जाधव

पू. (सौ.) जाधवकाकू या प्रीतीचा सागर आहेत. त्यांचे प्रीतीमय हास्य पाहिल्यावर वाटायचे, ‘हे परात्पर गुरु डॉक्टरांचेच हास्य आहे !’ मला या विचाराने काही वेळ सगळ्याचाच विसर पडायचा.

३. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव रहात असलेल्या खोलीतून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

कु. मनीषा शिंदे

सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांच्या महतीचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्या व्यस्त असल्यामुळे आम्हाला त्यांचा अल्प सहवास लाभला. ‘त्यांच्या खोलीतून निर्गुण चैतन्य पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवायचे. त्यांच्या प्रेमाचा मृदू स्पर्शही मला पुष्कळ काही देत होता.

४. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

४ अ. सद्गुरु अनुताईंच्या प्रीतीमय स्पर्शातून आध्यात्मिक त्रासाचे निवारण होत असल्याचे जाणवणे : ‘येता-जाता सर्वांची काळजी घेणाऱ्या सद्गुरु अनुताई म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप आहे’, असे मला वाटत होते. त्या माझ्या मनातील सर्व ओळखायच्या. त्यांच्या स्पर्शातून आमच्यात प्रीतीमय संवाद व्हायचा. ‘यातून त्या मला होणाऱ्या आध्यात्मिक त्रासाचे निवारण करत आहेत’, असे मला जाणवायचे.

४ आ. सद्गुरु अनुताईंच्या वाणीतील चैतन्याने उत्साह वाढणे : एकदा मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत नामजप करण्यासाठी बसले होते. तेव्हा मला होत असलेल्या त्रासामुळे मला सद्गुरु अनुताईंकडे पहाता येत नव्हते. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘मनीषा, कशी आहेस ?’’ त्यांच्या या बोलण्यामुळे माझा उत्साह वाढला.

५. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव देवद आश्रमातून निघतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वचनाची प्रचीती येणे

मुंबई सेवाकेंद्रात जातांना सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू आम्हाला भेटायला आल्या. स्वयंपाकघरात सेवा करणाऱ्या सर्वांना त्या भेटत होत्या. ‘आई जशी सर्व लेकरांना प्रेम देते, त्याप्रमाणे मला त्या दोघींचे वागणे आहे’, असे जाणवले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका वचनाची प्रचीती आली. एकदा ते म्हणाले होते, ‘‘निरोप कसला माझा घेता ? मी तुमच्या जवळच आहे आता !’’

सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांची प्रीती अन् त्यांच्या सहवासातील क्षणमोती माझ्या हृदयात कोरले गेले आहेत. ‘त्या माझ्या जवळच आहेत’, असे मला जाणवते आणि मला अनाहतचक्राच्या ठिकाणी तशी स्पंदने जाणवतात.

६. कृतज्ञता

प.पू. माऊली, आपण धन्य आहात ! अशी अनमोल संतरत्ने घडवून त्यांचा, म्हणजे आपलाच अनमोल सहवास आपण आम्हाला दिलात. त्याबद्दल आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !

– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२१)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक