भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील कुंडलपूर आणि बांदकपूर या शहरांना ‘पवित्र क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या दोन्ही ठिकाणी मांस आणि दारू यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. बांदकपूर शहर हे शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे, तर कुंडलपूर जैन तीर्थक्षेत्र आहे. ही दोन्ही शहरे दामोह जिल्ह्यात आहेत. मुख्यमंत्री चौहान कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
दो शहरों को ‘पवित्र क्षेत्र’ घोषित करते हुए कहा कि वहां मांस और शराब की बिक्री पर प्रतिबंध लगाया जाएगा. https://t.co/YfbJMAySBG
— Zee News (@ZeeNews) February 22, 2022