‘मराठी भाषेत अविवाहित प्रौढ (४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या) स्त्रियांच्या नावांच्या आधी लावण्यासाठी स्वतंत्र उपाधी नाही. अशा स्त्रियांना ‘कुमारी’ लावणे ऐकावयास बरे वाटत नाही आणि ‘श्रीमती’ ही उपाधी गेल्या काही वर्षांपासून विधवा स्त्रियांना लावणे रूढ झाले आहे. त्यामुळे तीही लावता येत नाही. अशा स्थितीत विवाह न केलेल्या प्रौढ स्त्रियांना संस्कृत भाषेतील ‘सुश्री’ ही स्त्रियांना आदराने संबोधण्यासाठी वापरली जाणारी उपाधी लावणे योग्य ठरते.’
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२१)