भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त वतीने कार्यक्रमांचे आयोजन
७ फेब्रुवारी : या दिवशी दुपारी १ वाजता वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता मोतीबाग चौकात ‘अखिल भारतीय विराट कवि संमेलन’ होणार आहे.
८ फेब्रुवारी : या दिवशी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी भोजशाळा येथे नियमित सत्याग्रह होणार आहे आणि त्यानंतर सकाळी १० वाजता येथील अखंड संकल्प ज्योती मंदिर येथे कन्यापूजन आणि कन्याभोजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. |
धार (मध्यप्रदेश) – वसंतपंचमीच्या निमित्ताने भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त वतीने येथील भोजशाला येथे ५ फेबु्रवारीपासून चालू झालेले कार्यक्रम ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून मोठी सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे, अशी माहिती स्थानिक जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिली आहे.
(सौजन्य : विश्व संवाद केंद्र, मालवा)
वसंतपंचमीच्या निमित्ताने येथील भोजशाळेमध्ये श्री सरस्वतीदेवीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने भोज उत्सव समितीच्या वतीने संरक्षित स्मारक भोजशाळा अणि मोतीबाग चौक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.