जगातील शहरांमुळे ७० टक्के वायूप्रदूषण होते ! – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम

यावरून शहरीकरण किती घातक आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – जगातील अर्धी लोकसंख्या शहरांमध्ये रहाते आणि तेथेच ७० टक्के वायूप्रदूषण होत आहे. हेच प्रदूषण पर्यावरणाला नष्ट करत आहे. यामुळेच पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी शहरांनी मुख्य भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अभ्यासाच्या निष्कर्षामध्ये म्हटले आहे.

या अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, इमारतींचे मालक आणि त्यामध्ये रहाणारे नागरिक यांना पर्यावरणाच्या सुरक्षेविषयीच्या त्यांच्या दायित्वाविषयी जागृत होणे आवश्यक आहे. ३८ टक्के वायूप्रदूषण हे इमारतींचे बांधकाम आणि नंतरचा कार्यकाळ यांमुळे होते. जर यावर नियंत्रण मिळवले, तर पृथ्वीवरील १.५ डिग्री सेल्सियस तापमान न्यून करता येऊ शकते.