माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला ! – श्वेता तिवारी यांचा दावा
भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘माझ्या अंतर्वस्त्राचे माप देव घेतो’, असे विधान करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी क्षमायाचना केली आहे.
#ShwetaTiwari issues apology for her ‘bra size’ remark: My statement has been misconstruedhttps://t.co/bZY2fVmbWs
— India TV (@indiatvnews) January 29, 2022
श्वेता तिवारी यांनी म्हटले आहे की, माझ्या लक्षात आले आहे की, माझ्या सहकार्यासमवेतच्या भूमिकेविषयीच्या माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि तो चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. त्या विधानाचा संदर्भ समजल्यावर कळेल की, या वक्तव्यात देवाची भूमिका साकारणार्या सौरभ राज जैन यांच्यासाठी ‘देव’ हा शब्द वापरला आहे. मालिकेमध्ये त्याचे नाव ‘देव’ असल्याने मी त्याला उद्देशून विधान केले होते. अभिनेत्यांच्या पात्रांच्या नावांशी लोक जोडले जातात; म्हणून मी माध्यमांशी झालेल्या संवादात ते उदाहरण दिले; पण त्याचा गैरसमज झाला. याविषयी मला खेद वाटतो. माझा स्वतःचा देवावर पुष्कळ विश्वास आहे. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत कोणाशीही असे बोलून धार्मिक भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता; पण मला कळले की, नकळत लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझ्या बोलण्याने किंवा कृतीने कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, म्हणून मी क्षमा मागत आहे.