अंबरनाथ येथे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रायोजित केलेले सनातन-निर्मित ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने यांचे दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून वितरण !

डॉ. बालाजी किणीकर

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) – येथील शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना सनातनच्या धर्मकार्याविषयी आत्मियता असल्याने त्यांनी सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने प्रायोजित केली होती.

अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळ या ग्रंथालयाच्या सहकार्याने दिवाळी अंकाचे  सभासद, तसेच ग्रंथालयात येणारे अन्य सभासद वाचक यांना हे सनातन-निर्मित ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने यांचे वितरण करण्यात आले. या वेळी सभासद वाचकांना आवडणार्‍या विषयाचा ग्रंथ आणि आवडणार्‍या सुगंधाचे उत्पादन (सनातन-निर्मित उदबत्ती, साबण, अत्तर इ.) घेण्यास सांगण्यात आले.

सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथ

अंबरनाथ येथील लायन्स क्लबच्या सभागृहामध्ये सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांच्या हस्ते ‘हस्तलिखित दिवाळी आरोग्य विशेषांका’चे प्रकाशन आणि त्यांच्या आरोग्यविषयक व्याख्यानाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातही आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रायोजित केलेले सनातन-निर्मित ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने यांचे वितरण करण्यात आले. येथे उपस्थितांना सोडत पद्धतीने ग्रंथवितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ‘लायन्स क्लब ऑफ अंबरनाथ’चे श्री. शैलेश सकपाळ आणि सौ. सुनयना कालेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

वरील दोन्ही कार्यक्रमांत आयुर्वेद, आहार, आपत्काळ, सण-उत्सव, धार्मिक कृती, आचारधर्म आदी विषयांवरील सनातन-निर्मित ग्रंथ या ठिकाणी ठेवण्यात आले होते. वरील दोन्ही कार्यक्रमांची संकल्पना सनातनच्या साधिका सौ. श्रावणी फाटक यांची होती आणि त्यांनी त्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.