राधानगरी (जिल्हा कोल्हापूर), ३० डिसेंबर (वार्ता.) – सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी व्यापार्यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. तरी धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथे नायब तहसीलदार अतुल काकडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांच्यासह धर्मप्रेमी सर्वश्री वैभव माने, दयानंद भोईटे, नितीन मगदूम, संतोष कुंभार उपस्थित होते.