महिलांनो, राष्ट्रोन्नतीसाठी आरक्षणाच्या मोहाचा त्याग करून स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून गुणविकास करा !

महिलांनी आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्याव्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. असे असतांना अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना विशेष अधिकार आणि आरक्षण दिले जाते. जेथे क्षमता, गुणवत्ता आणि कौशल्य यांना निष्फळ करून केवळ आरक्षणाच्या बळावर महिला पदे भूषवतात, तेथे सर्वसामान्य जनांच्या मनात महिलांच्या कर्तृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. महिलांनी आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्याव्यात आणि स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कार्य करावे. असे केल्याने महिलांची सुप्त क्षमता जागृत होईल आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व उजळून निघेल. महिलांना खर्‍या अर्थाने प्रगती करायची असेल, तर त्यांनी आरक्षण आणि विशेष अधिकार यांचा मोह सोडून केवळ स्वबळ अन् स्वकर्तृत्व यांवर विश्वास ठेवून धडाडीने प्रयत्न करणे देवाला अपेक्षित आहे. महिलांनी आरक्षण आणि विशेष अधिकार यांचा त्याग करून स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रयत्न केले, तर प्रत्येक क्षेत्राची गुणवत्ता वाढेल. त्यामुळे प्रत्येक पदावर योग्य आणि गुणवान व्यक्तीची नियुक्ती होऊन शासन, प्रशासन इत्यादी क्षेत्रांतील कारभार सुरळीतपणे चालू लागेल. महिलांनी आरक्षणाचा मोह सोडला, तर सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नती होऊन समष्टीचे कल्याण होईल.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१७, रात्री ११.२३)