आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

रोजगारासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी निर्णय !

रशिया, जर्मनी, फ्रान्स, जपान आदी विकसित देशांनी आणि चीननेही  मातृभाषेतूनच प्रगती साध्य केलेली असतांना स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही भारतियांना इंग्रजी भाषेची गुलामी करावी लागत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

हिंदु राष्ट्रात संस्कृत, तसेच मातृभाषेतून शिक्षण दिले जाईल आणि त्यांना रोजगाराच्याही संधी असतील !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश सरकारने पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.

ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.