महिलेवर लैंगिक अत्याचार आणि तिची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

जनतेचे रक्षण करणे सोडून उलट शोषण करणार्‍या अशा स्त्रीलंपट आणि भ्रष्टाचारी पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

पोलिसांना नीतीमत्तेचे शिक्षण नसल्यानेच पोलीस स्वतःच गुन्हेगारीकडे वळत आहेत !

 

पणजी, २३ जून (वार्ता.) – वेर्णा पोलिसांनी मुरगाव तालुक्यातील हार्बर पोलीस ठाण्याशी निगडित पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांच्या विरोधात महिलेवर लैंगिक अत्याचार करणे आणि तिची फसवणूक करणे यांप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ अन् कलम ४२० अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे.

मुरगाव येथील २७ वर्षीय महिलेने पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांनी लग्नाचे आमीष दाखवून डिसेंबर २०१९ मध्ये नाशिक येथे तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे याने संबंधित महिला आणि तिचे पालक यांना ४४ लक्ष रुपयांचा गंडा घातल्याचे महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे.