भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची नूतन औषधे

सध्याच्या कोरोनाच्या रूपाने आपत्काळाची झलक अनुभवायला येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी दळणवळण बंदीमुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’, असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. भावी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्‍या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील. या औषधांविषयीची आज शेवटची माहिती पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488904.html
सनातनची आयुर्वेदाची औषधे (प्रातिनिधिक छायाचित्र)

२०. सनातन लशुनादि वटी (गोळ्या)

२० अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे एक उत्तम पाचक औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

२० आ. सूचना

१. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.

२. उष्णतेची लक्षणे (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) असतांना आणि मलाचा खडा होत असेल, तर या औषधाचा वापर करू नये.

३. हे औषध उष्ण असल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हिट) या काळात जपून वापरावे.

४. या गोळ्यांमध्ये सैंधव मीठ असल्याने या जास्त वेळ हवेच्या संपर्कात आल्यास हवेतील आर्द्रतेमुळे ओलसर होऊन खराब होतात. त्यामुळे तसे होऊ नये, यासाठी डबीचे झाकण घट्ट लावावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

(समाप्त)