सध्याच्या कोरोनाच्या रूपाने आपत्काळाची झलक अनुभवायला येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी दळणवळण बंदीमुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’, असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. भावी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील. या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488175.html |
१५. सनातन लघुमालिनी वसंत (गोळ्या)
१५ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध शरिरातील अग्नीला प्रदीप्त करून जुनाट ताप इत्यादी विकार दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
१५ आ. सूचना : तोंड येणे आणि अंगाची आग होणे ही लक्षणे असतांना हे औषध घेऊ नये.
१६. सनातन त्रिभुवनकीर्ति रस (गोळ्या)
१६ अ. संभाव्य उपयोग : हे तापावरील औषध म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
१७. सनातन संशमनी वटी (गोळ्या)
१७ अ. संभाव्य उपयोग : हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे प्रसिद्ध औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
१८. सनातन सूतशेखर रस (गोळ्या)
१८ अ. संभाव्य उपयोग : हे औषध पित्ताची मात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
१७ आ. सूचना : हातापायांची किंवा अंगाची आग होणे, अंगातून वाफा आल्याप्रमाणे वाटणे, डोळे गरम होणे अशी तीव्र उष्णतेची लक्षणे असल्यास हे औषध वापरू नये.
सर्व औषधांसाठी सामायिक सूचना :
१. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.
२. औषध क्र. १६ ते १८ साठी सूचना : वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची नूतन औषधे यांची माहिती सांगणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी. |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488904.html |