हिंदूंची संस्कृती आणि धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि कुंभमेळा यांचे आध्यात्मिक महत्त्व हे विश्वात अद्वितीय आहे. कुणीही हिंदु देवतांची विटंबना केल्यास त्यावर कायद्याने विरोध करता येतो. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणार्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करता येते. सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित होईल.