आमच्या घरात आम्हा तिघांना कोरोनाची लागण झाली होती. भगवंताच्या कृपेमुळे आमच्याकडे दोन घरे होती, त्यामुळे आम्ही दोन्ही घरांपैकी एक घर विलगीकरणासाठी वापरले. आम्हाला कोरोना झाला, त्या वेळी बाणेरमधील (पुणे) ‘आदित्य क्लिनिक’ येथे स्थानिक आधुनिक वैद्य राहुल दोशी यांनी आमच्यावर उपचार केले. डॉ. दोशी रुग्णाचे योग्य निदान करणे आणि रुग्णांची चांगली काळजी घेणे यांसाठी प्रसिद्ध आहेत. मी त्यांना बर्याच वेळा विचारले की, माझ्या आईचे वय ६३ वर्षे आहे आणि आम्हाला तिला रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे का ? त्यावर त्यांनी मला सांगितले की, तू तुझ्या आईविषयी काळजी करू नकोस. ती १०० टक्के ठीक होईल आणि कोरोनामुक्त होईल.
एकूणच ही परिस्थिती घरी विलगीकरणाच्या कालावधीत कशी हाताळायची, याविषयी मी नवीन होतो; परंतु आदित्य क्लिनिकमधील आधुनिक वैद्य आणि २ परिचारिका यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. जेव्हा आम्हाला आवश्यक असेल, तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांशी ‘ऑनलाईन’ सल्ला देण्याची व्यवस्था केली, तसेच त्यांना आम्हाला प्रोत्साहनदायी आणि सकारात्मक विचार दिला अन् साहाय्य केले.
उपचारांच्या वेळी कोरोनासाठीचा नामजप आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्याने लाभ होणे
आम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांसह देवाला शरण जात होतो. त्यामुळे आम्हाला या रोगाचा सामना करण्यास साहाय्य झाले. याच काळात मी कोरोना निर्मूलनासाठीचा नामजप करण्यास प्रारंभ केला आणि घरी असतांना आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करू लागलो. याचा आम्हाला पुष्कळ लाभ झाला आणि सर्वांना चांगले वाटायला लागले.
या कठीण परिस्थितीत केवळ सनातनचे साधक श्री. सुधीर शिकेतोले आणि जवळचे काही मित्र यांनी आवश्यक सर्व गोष्टी देण्यास साहाय्य केले. आज जेव्हा मागे वळून पहातो, तेव्हा देवाची कृपादृष्टी आपल्यावर दिसते आणि परात्पर गुरुदेवांनीच त्यातून बाहेर पडण्यास साहाय्य केले, असे जाणवते.
– श्री. सागर विलास काशिद, बालेवाडी-बाणेर, पुणे
कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !आरोग्य साहाय्य समिती पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |