राज्याभिषेकाची सिद्धता झाली होती. रामचंद्र तसेच प्रसन्न आणि शांत होते. धीरगंभीर होते. दुसर्याच क्षणी वडिलांच्या दर्शनाला जात असतांना कळले की, त्यांना राज्यभ्रष्ट करण्यात आले आहे. कैकयीने सांगितले, ‘तुला वनवासात जायचे आहे.’ वनवासाच्या दुःखाचा क्षण आणि युवाराज्याभिषेकाचा क्षण. रामचंद्र दोन्ही प्रसंगी सारखेच प्रसन्न आहेत. ज्याची बुद्धी स्थिर आहे, तो आनंदाने उचंबळत नाही आणि दुःखाने खचतही नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘कर्मसंन्यासयोग’ ग्रंथ)