राजकीय कूटनीतीमुळेच हद्दपारीची नोटीस ! – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना


कोल्हापूर – वर्ष २००८ मध्ये एका खूनप्रकरणामध्ये मला विनाकारण गोवले होते. यातून न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. हा गुन्हा सोडला, तर माझ्यावर समाजघातक कोणतेच गुन्हे नाहीत. राजकीय कूटनीतीमुळेच मला हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. माझे कोणतेही अवैध धंदे नाहीत. माझी चूक दाखवा आणि मग हद्दपार करा, असा खुलासा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे. इंगवले यांना पोलीस प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली.

इंगवले पुढे म्हणाले, ‘‘आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिक संख्येने जागा येण्यासाठी शहरभर फिरत आहे. त्यामुळे माझा आवाज बंद करण्यासाठीच पालकमंत्र्यांच्या आदेशानेच मला हद्दपारीची नोटीस देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. महाविकास आघाडीचे नाव पुढे करून राजकीय हालचाली आणि डावपेच चालू असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी केली आहे.’’ या परिषदेला सागर साळोखे, सचिन चौगुले, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.