‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३७ वर्षे झाल्यानिमित्त खलिस्तान्यांनी सुवर्ण मंदिरात फडकावले खलिस्तानी झेंडे !

खलिस्तान्यांची नेहमी होणारी अशी वळवळ सरकार चिरडून का टाकत नाही ? त्यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही ?

(डावीकडे) सुवर्ण मंदिर, अमृतसर

अमृतसर (पंजाब) – येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याकडून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ६ जून या दिवशी ३७ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने अमृतसरमध्ये निदर्शने करण्यात आली, तसेच सुवर्ण मंदिरात एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काही जणांनी या ऑपरेशनमध्ये मारला गेलेला खलिस्तानी आतंकवाद्यांचा प्रमुख जर्नल भिंद्रनवाले याचे छायाचित्र असणारे भित्तीपत्रक आणि खलिस्तानचा झेंडा फडकावला. या वेळी घोषणाबाजी करत कापडी फलक दाखवण्यात आले, तसेच तलवारीही दाखवण्यात आल्या. या वेळी भिंद्रनवाले याचा मुलगाही उपस्थित होता. संपूर्ण अमृतसरमध्ये ६ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.