२८.१२.२०२० या दिवशी केरळ येथील कोची शहरात दत्तजयंतीनिमित्त हिंदी भाषेत प्रवचन होते. २९.१२.२०२० या दिवशी मल्याळम् आणि हिंदी भाषिक लोकांसाठी दत्ताचा सामूहिक नामजप आयोजित केला होता. त्यानिमित्ताने केरळ येथील साधकांनी जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना ‘दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व अन् मल्याळम् भाषेतील ‘दत्त लघुग्रंथ’ यांविषयी सांगून त्यांना सामूहिक नामजपात सहभागी करुन घेतले. अशा विविध सेवा करतांना साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. शालिनी सुरेश, फोर्टकोची
अ. ‘२८.१२.२०२० या दिवशी सेवा करतांना माझे मन शांत होते आणि मला सेवेतून आनंद मिळत होता.
आ. दत्ताच्या सामूहिक नामजपाच्या वेळी मला माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ वेळ संवेदना जाणवत होत्या. त्या वेळी माझे मन शांत होते.’
२. श्री. नंदकुमार कैमल, एर्नाकुलम्
अ. ‘लोकांना सामूहिक नामजपाविषयी सांगण्यासाठी संपर्क करतांना मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अनेक वेळा अनुभवता आले. त्यामुळे मला समोरील व्यक्तीचा प्रतिसाद चांगला मिळत होता.
आ. हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ पहाणारे एक जिज्ञासू सुटीवर असूनही त्यांनी नामजप करण्याची सिद्धता दर्शवली.’
३. श्री. कनकराज, कण्णूर
अ. ‘मला दत्तजयंतीच्या दिवशी दत्तात्रेयाच्या अवतार कार्याविषयी एक ग्रंथ मिळाला आणि मी देवाचरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
४. श्री. साईदीपक गोपीनाथ, थिरूवनंतपूरम्
अ. ‘पत्नीच्या (सौ. अंजना साईदीपक यांच्या) आजीच्या मनात सतत त्यांच्या मुलाच्या मृत्यूचे विचार येत असतात; म्हणून मी त्यांना दत्ताच्या नामजपाविषयी सांगितले. त्यांनी दत्ताचा नामजप करणे चालू केल्यावर त्यांच्या मनात मुलाच्या मृत्यूविषयी येणारे विचार न्यून झाले.
आ. ‘समाजात असे किती लोक दुःखी असतील ? त्यासाठी आपण दत्ताच्या नामजपाचा प्रसार करायला हवा’, असे लक्षात आले.
इ. प्रसार करतांना लक्षात आले, ‘स्वत:च्या मनाचाच सर्वांत मोठा अडथळा आहे. प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरण जाऊन ते जे सुचवतात, त्याप्रमाणे करायचे.’
५. सौ. अवनी लुकतुके, एर्नाकुलम्
अ. ‘२८.१२.२०२० या दिवशी मी हिंदी भाषेत प्रवचन करतांना ‘माझ्या तोंडून दुसरे कुणीतरी बोलत आहे’, असे मला अनुभवायला आले.
आ. २९.१२.२०२० या दिवशी दत्ताचा सामूहिक नामजप होता. त्या वेळी मला डोळ्यांसमोर गुरुपादुका दिसत होत्या आणि त्यातून पुष्कळ थंडावा जाणवत होता.’
६. सौ. सुमा पुथलत, एर्नाकुलम्
अ. ‘२८.१२.२०२० या दिवशी मी हिंदी भाषेतून प्रवचन करत होते. तेव्हा माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटत होते.
आ. २९.१२.२०२० या दिवशी सामूहिक नामजप होता. त्या वेळी ‘माझे मन बाहेरून आत खेचले जात आहे आणि माझ्या डोक्यापासून पायाकडे काहीतरी आत जात आहे’, असे मला वाटत होते.’
७. श्रीमती माया प्रमोद, पळ्ळूरुत्थी
अ. ‘मी दत्ताचा सामूहिक नामजप करत असतांना मला असलेली डोकेदुखी आणि थकवा नाहीसा झाला. त्या वेळी मला हलकेपणा जाणवत होता आणि आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |