सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याच कृपेने सुचलेले काव्य श्री गुरुचरणी अर्पण !
जन्मोत्सव प्राणप्रिय गुरुदेवांचा ।
साजरा होई जगभरातील साधकांच्या मनांत ।। १ ।।
गुरुतत्त्व वसे रोमारोमांत ।
अनुसंधान गुरुमाऊलीचे अंतःकरणात ।। २ ।।
कृतज्ञता राहो श्वासाश्वासात ।
रामराज्य स्थापू अंतर्बाह्य मनात ।। ३ ।।
– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |