आत्महत्या केलेल्या एका मुलीचे छायाचित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवल्यावर काही दिवसांनी छायाचित्रातील त्रासदायक स्पंदने जाऊन त्याकडे पाहून चांगले वाटणे !

‘आत्महत्या करणे म्हणजे ईश्‍वराच्या सृष्टीचक्राच्या नियोजनात ढवळाढवळ करणे, स्वेच्छेने वागणे, असे आहे. आत्महत्या केल्यावर त्या जिवाला ६ व्या नरकात स्थान मिळते. अशा जिवाला गती मिळत नाही; पण तो जीव साधना करणारा असेल आणि त्याच्यावर गुरुकृपा असेल, तर देवता त्या जिवाला नरकातून बाहेर काढतात.

काही वर्षांपूर्वी एका साधिकेच्या बहिणीने आत्महत्या केली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या साधिकेकडून तिच्या बहिणीचे छायाचित्र मागवले अन् त्याचे सूक्ष्म परीक्षण केले, तेव्हा असे दिसले की, त्या साधिकेचा जीव अजून नरकातच अडकला आहे. त्यानंतर त्यांनी ते छायाचित्र त्यांच्या खोलीतील कपाटात ठेवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ठराविक दिवसांनी सूक्ष्म-विभागातील साधकांना त्या छायाचित्राचे परीक्षण करण्यास सांगितले. तेव्हा असे लक्षात आले की, काही दिवसांत त्या साधिकेच्या बहिणीला देवाने नरकातून बाहेर काढून तिला पुढची गती दिली. यावरून स्पष्ट होते की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अवतारी गुरु असतील, तर केवळ साधकच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुळाचाच ते उद्धार करतात.’

– श्री. दिवाकर आगावणे, चेन्नई, तमिळनाडू. (२१.४.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक