शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची वाढती आकडेवारी 

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्ष १९८६ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आरंभ झाला. वर्ष २०१९ मध्ये देशात १० सहस्र २८१ आणि त्यांपैकी महाराष्ट्रात ३ सहस्र ९२७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. मार्च ते मे २०२० या काळात ३ मासांत १ सहस्र १९८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. हा शेतकर्‍यांच्या अल्प कालावधीतील आत्महत्यांचा उच्चांक आहे. वर्ष २००१ पासून २०२० पर्यंत ३४ सहस्र २०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी नोंद आहे. यातील काही खोट्या आत्महत्यांची नोंद आहे, असे जरी धरले, तरीही हा आकडा मोठाच आहे. यांतील सर्वाधिक १५ सहस्र २२१ आत्महत्या या अमरावती विभागात झाल्या आहेत. संभाजीनगर भागात ७ सहस्र ७५१ शेतकर्‍यांनी गळफास लावून घेतला. कोकणात सर्वाधिक न्यून ३० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. देशात सर्वांत अधिक महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात.

कर्जमाफीच्या योजनेत काही शेतकर्‍यांना कर्ज मिळू शकले नाही. तर काही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीनंतरही आत्महत्या चालूच आहेत. अवकाळी पाऊस आणि दुष्काळ ही तर हानीची कारणे आहेतच, त्याचसमवेत कधी शेतमालाचे भाव पडलेले असतात, तर कधी उत्पादन व्यय वाढलेला असतो. त्यामुळेही आत्महत्या चालू आहेत.

कर्ज देत रहाणे हा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरील कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. अन्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे.